सांगाती
सांगाती
स्वावलंबनाची अभिनव व युक्ती.
कौशल्याचा विकास करूनी.
बेकारीतून मिळवी मुक्ती.
जागा हो तरुणा, जागा हो तरूणा.
तुला रिकामा पाहून
माझ्या होती मना यातना...
अवतीभवती किती सुसंधी.
जग बाजारी आर्थिक मंदी
हात पाय तू गाळू नको रे
जाई तू पुढती पुढती. .....(१)
तूच स्वतःचा हो सांगाती
ईश्वर आहे तुझ्या पाठीशी
इच्छाइच्छा जिथे तर मार्ग
तिथे स्वयंसिद्ध वा युवक-यवती ...(२)
सुशिक्षित तू नाही नोकरी.
म्हणुनी मिळेना तुला छोकरी.
रोजीरोटीची तुझ्या चतुर
कौशल्याने करी निर्मिती....(३).
होई आता स्वावलंबी तू
थोरांचे आदर्श ठेव तू
आधाराची गरज तुला का?
ओळखतो तू आपली शक्ती......(४)
