STORYMIRROR

Nilesh Jadhav

Abstract Others

4  

Nilesh Jadhav

Abstract Others

सांग मित्रा त्याचा धर्म कुठला?

सांग मित्रा त्याचा धर्म कुठला?

1 min
272

त्याचा जाणून बुजून झालेला स्पर्श 

तिला खुप किळसवाणा वाटला

मग सांग मित्रा त्याचा धर्म कुठला...?


आपल्या म्हाताऱ्या बापाला 

तो रस्त्यावर बिनदिक्कतपणे सोडून गेला

मग सांग मित्रा त्याचा धर्म कुठला...?


गरिबांवर अत्याचार करताना 

मला तर तो खुपच निर्दयी वाटला

सांगशील का मित्रा त्याचा धर्म कुठला...?


रोज मंदिराबाहेर दिसणारा भिकारी

आज मला मश्चिदी बाहेर दिसला

मग सांग मित्रा त्याचा धर्म कुठला..?


तिथेच जवळ हो अगदी जवळ

मदतीसाठी सरसावल्या हातात मला देव भेटला

त्या हातांचा धर्म काय.? मला आजवर नाहीच कळला


ना हिंदू ना मुस्लिम ना आणखी कोणी

समोरून आलेला माणूस मला तर माणसासारखाच दिसला

सांगू शकशील का मित्रा त्याचा धर्म कुठला...?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract