STORYMIRROR

sandeeep kajale

Abstract

4  

sandeeep kajale

Abstract

एक मोरपिसी स्वप्न

एक मोरपिसी स्वप्न

1 min
407

जादूच्या नगरीतून उतरून

आला एक वेगळा भास


खेळत होती नभाशी

वाटे जणू आभास


ढगांच्या गर्दीतून

घेऊन येती इंद्रधनू


काय तिजला म्हणावे

कसे तिला वर्णू


डोक्यावर सोन्याचा मुकुट

आणि हातात जादूची कांडी


पांढरेशुभ्र वस्त्र तिचे

जसे ताऱ्यांचा पुंजका सांडी


अलगद येणे तिचे,

स्पर्शावे तिने अलवार


आपल्या स्मितहास्याने

जीवन होती बहारदार


इच्छा व्यक्त करताच

पूर्ण करते ती


लहानग्यांच्या जीवनात

आणते वेगळीच गती


आहे ती सुंदर परी

आणि एक मोरपिसी स्वप्न


आता एवढेच फक्त

तिच्या छबीला मनातच जपणं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract