गरिबी-एक प्रेरणा
गरिबी-एक प्रेरणा
विचारांचा वणवा पसरला
गर्द मनाच्या शिवारात
अश्रूंना मिळाला दिलासा
दोन डोळ्यांच्या आवारात
डोकावून पाहता मनी
दिसले दुःख गाभाऱ्यात
केव्हचीच सुख गेले होते
भुर्रकन उडून वाऱ्यात
हिसकावून आनंद सारा
वावरतेय दैन्य दारात
मिळवेन पुन्हा ऐश्वर्य
संचारली वीरश्री उरात
