STORYMIRROR

Anil Chandak

Abstract Others

4  

Anil Chandak

Abstract Others

बरसती नयनातुनी धारा

बरसती नयनातुनी धारा

1 min
232


रस्त्यावरच्या पाऊलखुणा, आठवणीच्या तारा!

पापण्यात दाटता,बरसती नयनातूनी धारा!!धृ!!


स्मरणात मनी गुंतुनी राहिल्या!

आठवणींचा ,  खेळ खेळल्या !!


दाटुन सगळ्या उतरल्या सरसरा!!1

   ....बरसती नयनातूनी धारा



होते माझे,कसे निसटले,

एक एकटे जगणे झाले !

नयन पाखरे फिरे भिरभिरा !!2


....     बरसती....



जीवनाचे रंग बदलले,

हसणे जणु,हरवून गेले !

चिंब अश्रुंनी,मनावरी भारा !!3


     ....बरसती




ओठावरचे,  हास्य विसरले,

चैतन्य जणु, लुप्त  पावले !

दु: ख चाळवी,नकळत वारा !!4



     .....बरसती




ह्रदयांची,  तडफड  झाली,

डोळ्यापुढती,  अंधेरी  आली !

तडफडतो, जीवनाचा शिकारा !!5




     .....बरसती नयनातूनी धारा



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract