चा-हुल
चा-हुल
शिशिराची चाहूल
थंडीचे पाऊल..
गुलाबी स्वप्नांची
उठलेली हुल..!!
गडद पसरलेली
धुक्याची चादर..
जागोजागी विरलेला
नक्षीदार पदर..!!
फुलांचे ताटवा
पानांवर फुललेला..
दवबिंदूचा ओघळ
गालावर सुकलेला..!!
पोळलेले अंतर्मन
गोठलेला क्षण..
दोन ध्रुवावर
विसावलेले मन..!!
