STORYMIRROR

Piyush Lad

Abstract Others

4  

Piyush Lad

Abstract Others

प्रवास आयुष्याचा..!

प्रवास आयुष्याचा..!

1 min
999

निर्माता या चित्रपटाचा होऊनि किती कठीण भूमिका देतोयस

अभिनेता आम्हास बनवून खुशाल आनंद घेतोयस

रोज रोज काम नको देवा एक तरी सुट्टी असू दे 

आयुष्याच्या या चित्रपटाला थोडा तरी रस येऊ दे   ।।१।।


हृदयावर्ती किती ते ओझं तोच तोच संघर्ष का रे रोज

दुःखाच्या गर्भात जर रे सुखालाही जन्म घेऊ दे 

आयुष्याच्या या.... ।।२।।


रोजचा तो एकाच दिनक्रम आता वीट आलाय देवा 

कुणाच्यातरी पुढे जाऊन आता मलाही करायचाय हेवा

काट्यांच्या रानात जरा रे फुलांचाही वास येऊ दे

आयुष्याच्या या.. ।।३।।


नम्रपणा करत करत किती खाली वाकायचे

पोहोचू पोहोचू म्हणत म्हणत किती पाऊल टाकायचे

सतत लांब लांब दिसतो रस्ता

कुठेतरी वळण दिसू दे

आयुष्याच्या या .....   ।।४।।


इच्छांनी तर माझी कित्येक वेळा थट्टा केलीये

स्वप्नांची तर माझ्या मागेच हत्या झालीये

जीव तळमलतोय परमेश्वरा मोकळा श्वास तरी घेऊ दे

आयुष्याच्या या..  ।।५।।


जगावं तरी कसं देवा खूप मोठा प्रश्न पडलाय उत्तर कुठेच मिळत नाहीये

यमाचा चेहरा कित्येकदा पाहून आलो मी पण मरणही मला गिळत नाहीये

आयुष्य तर नकोच ए परमेश्वरा निदान जगण्याचा भास तरी होऊ दे

आयुष्याच्या या...  ।।६।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract