सागरी किनारा (हायकु)
सागरी किनारा (हायकु)
सांज गारवा
मनी माझ्या पारवा
जसा झुरावा
अश्या एकांती
सागरी किनारी ती
वाट पाहती
निळ्याशार या
खुल्या नभाची काया
भासे ती छाया
नजरा असा
शांत किनारा कसा
तुझ्या माणसा
बेभान लाटा
अंगावरी झेलता
लागती वाटा
जरा उसंत
भावी मज हा संत
का मनी खंत
अस्तास जाता
सूर्य बिंब पाहता
मनी अवस्था
सांज ती मनी
भाळली या क्षणी
सागर राणी