भाव
भाव
1 min
205
आज नव्याने जाणते सय मायेची दुरावलेली
तुज परतुनी पहावे आस मनाची सुखावलेली
आज कच्ची वाटते डोर तुझ्या माझ्यातली
तुज पुन्हा सांगते ओळख मनाशी जपलेली
आज कष्टी वागते सांज कोवळी भावलेली
तुज सृष्टी मानते जाग मनासी हरवलेली
आज शब्दांत मागते सावली नयनी वसलेली
तुज पाहता विसावते काळजी मनात रुतलेली