अधीर मन
अधीर मन
जरा विसावली माया क्षणभर
जराशी हरवली काया कणभर
थबकल्या पावलांत आरवली
अधीर मनाची छाया क्षणभर
भान मनाला का छळते आसुयेत
मागण काळजाचं मागते मौनात
क्षितिजाला आस लावते कोणी
शब्दांत भावनांस गुंतते मनांत
अधीर मन ओढ लावी मेघास
क्षणांत नभाची होते घालमेल
आभास क्षणाचा देई आधार
काळजाची हाक येता दाटून
जरा विसावली माया क्षणभर
जराशी हरवली काया कणभर
थबकल्या पावलांत आरवली
अधीर मनाची छाया क्षणभर