एक संध्याकाळ
एक संध्याकाळ
आपलीशी वाटली कधी कधी परकी वागली
रित्या आभाळाची काहीली पापणीआड सजली
मोत्यांत नटली कधी कधी धुक्यात हरवली
मुक्या मनी झंकारली वार्यानी गाणी मंजुळ गायली
गुलाबी थंडीत कापरलेली कधी आठवात रमलेली
मनीच्या कोनाड्यात एक संध्याकाळ भिजलेली