STORYMIRROR

Swarupa Kulkarni

Romance

4  

Swarupa Kulkarni

Romance

रंग माझा वेगळा...

रंग माझा वेगळा...

1 min
247

रंग गहिरे सावळे ते

त्या कृष्णरंगी डोहातले ,

मी उभी काठावरी त्या

तो वाजवी वेणू तन्मयतेने...


मी राधा कृष्णसख्याची

तो गिरीधर मुरलीवाला,

कळेना सांज कधी झाली

मज झाली सावळबाधा...


तो उभा नयनांसमोर

न तृप्ती लोचनांस तरीही,

का भुलावे वेड्या राधेने 

रंग सांडूनी भक्तीप्रेमाचे...


प्रेमात दोघे रंगले ओतप्रेत

आज कृष्ण म्हणे राधेला,

रंगात रंगुनिया सखे गं

रंग माझा वेगळा...


सर्वांचा तरी तू वेगळा कसा रे?

आमुचा तरी अनासक्त रे,

नाही तुजला मायापाश कसले

गुंफिले तवपदी प्रितीचे रेशमीबंध..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance