धुंद भावना....
धुंद भावना....
अलवार तुझा एक स्पर्श
करतो आज धुंद मला
देखणा तुझा एक कटाक्ष
करितो घायाळ मनाला
अस्तित्वाची तुझ्या चाहूल
घालते भुरळ मनाला
आश्वासक शब्द तुझा
देतो दिलासा हृदयाला
भावना हळुवार प्रेमाची
सांगते गुज मायेने
नात्याचा बंध-अनुबंध
पुन्हा गवसतो नव्याने
उमलणे कळीचे अलवार
पसरतो प्रेमाचा बहर
चिंब भिजावे मनानेही
न ठेवावी कुठली कसर
धुंद व्हावे दोघांनीही
करावी जन्माची सोबत
जावे विसरून देहभान
आठवांना क्षणांची संगत.......

