STORYMIRROR

Durga Deshmukh

Romance Others

4  

Durga Deshmukh

Romance Others

उत्सव रंगाचा दुर्गा देशमुख

उत्सव रंगाचा दुर्गा देशमुख

1 min
257

उत्सव प्रेमाच्या रंगाचा 

उधळा मनातल्या प्रेमाचा रंग 

एकमेकात मिसळुन जाऊ 

होऊ एकाच रंगात दंग 


तुझ्या निस्वार्थी प्रेमाचा 

एक रंग लावते गालावर 

तु दिलेला प्रेमाचा रंग 

खुलुन दिसती माझ्या भाळावर 


एक रंग तुझ्या शांत स्वभावाचा 

सहन करतो माझा वसंत 

रखरखत्या उन्हातली सावली तु

 नाही मनाला कशाची खंत 


एक रंग तुझ्या गोड हास्याचा 

खुलवी ओठावरची लाली 

सुगंध उधळीत आला मारवा 

रंग उमटला माझ्या गाली 


एक रंग तुझ्या सहनशीलतेचा 

नेहमीच करतो मला प्रभावित 

शिकवुन जातो तुझ्या मनातले 

गावे म्हणतो प्रेमाचे गीत 


तुझ्या सहवासाच्या रंगात 

माझे नेहमीच भिजावे अंग 

रंगात रंग मिसळुन तो 

घेऊ राधाकृष्णाचा रंग 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance