तूजविण वाटे ही रात्र उदासी
तूजविण वाटे ही रात्र उदासी
चंद्र हसरा तो निल आकाशी
गीत तारकांचे जुळते सुरांशी,
नजरेला भावणारा तो चंद्रफुल
तुजविण वाटे ही रात्र उदासी
रोज नव्याने मज भेटतो तो चंद्र
आठवे त्यालाही प्रीत शब्दांची,
शांत त्या चांदण्याही मज पुसती
कुठे हरवली प्रीत चातकांची
चांदणराती नजर शोधीशी तुजला
चंद्र तारकांनी उजळले आकाश,
रीते तरीही भासे व्याकुळ मनाला
आठवणीत फुलतो प्रेम पलाश
कुंचले शुभ्र शीतचंद्र किरणांचे
भरले होते अपुऱ्या प्रीतशाईने,
ऋतू प्रेमाचे बहरता बहरता
राहीले अपुरे प्रेमस्पर्शाचे चांदणे
चंद्रही आज तो पुसतो मज
रात्र का ही निर्जीव भासते,
चंद्रफुलात मुख तुझे पाहण्यांस
आतूरलेली चांदणी ही तरसते

