प्रीत ऋतूकिरणांची
प्रीत ऋतूकिरणांची
1 min
161
आतूरतेने वाट पाहते सख्या तुझी
येशील परतूनी प्रीतीच्या वळणावर,
काळजाची तळमळ चातकापरी
भेटण्याची आस घेई उंच भरारी
सुर्य किरणांशिवाय ऋतू अपूर्ण
नजरेशिवाय तुझ्या नजर अपूर्ण,
सामावून घे मला नजरेत तुझ्या
तुझ्याशिवाय नयनी स्वप्न अपूर्ण
नील नभाशिवाय अवनी अपूर्ण
श्वासाशिवाय तुझ्या श्वास अपूर्ण,
श्वासात प्रीतीचा दरवळ तुझाच
तुझ्याशिवाय माझे जीवन अपूर्ण
रात्र काजळी काजव्याशिवाय अपूर्ण
प्रीतीचे रूप हृदया शिवाय अपूर्ण,
ओढ जणू प्रीतीची नजरेत सजली
रंग मिलनाचे मिलनाशिवाय अपूर्ण
नाव माझे तूझ्या नावाशिवाय अपूर्ण
ऋतू प्रेमाचा किरणांशिवाय अपूर्ण,
अतूट रेशीमगाठ विणली बंधनाची
शेवटच्या श्वासापर्यंत प्रीत ऋतूकिरणांची
