आशा
आशा
1 min
156
दुर धुकयाच्या गावात
वाट एकली अंधारली
सांज एकली क्षितिजास
ओढ जीवा लागली
पहाट सोनरी अंगणी
रात काजळी ती विरली
आशेची किरणं मनी
धुकयाची चादर ओसरली
जीवा आस ती वाटे
जगी सोबती ही सावली
भावनेची उभारी मना
भयाण वादळ निवळली
धुके हे विरताना पावले
आपसुक ती बळावली
आशेचे किरण दिसताना
जीवनी उषा अंतरली
प्रभाती सोनेरी श्वासारी
आसक्ति जीवना लागली