STORYMIRROR

Padmakar Bhave

Romance

4  

Padmakar Bhave

Romance

धुंद शिशिर

धुंद शिशिर

1 min
269

भेट तुझी रुतली हृदयी

धुंद शिशिराची

मिठी किती हळवी वेडी

गंधल्या क्षणांची।


बोलू पाहे काही दोघे

शब्द दगेबाज भारी

तुझ्या लोचनांची भाषा

स्पर्श करू पाहे जिव्हारी।

किती वेळ गेला तेव्हा

तास भरारा....

मौनातच कळले सारे

गुंतल्यात नजरा।

किती सावरू आवरली

मस्ती तुझ्या बटांची....

मिठी किती हळवी वेडी

गंधल्या क्षणांची।


ओथंबून घन आलेले...

शिशिरातही त्यावेळी,

किती भिजलो नसता पाऊस

क्षितीजाच्या गोड सकाळी

धडधडली काळीज किमया

न झालेल्या स्पर्शाची,

मिठी किती हळवी होती

गंधल्या क्षणांची।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance