सागर तट
सागर तट
उजाडली ती
रम्यात्मक पहाट
सागरी तट..1
वारा सुटला
हिंदोळे घेत मस्त
मी मदमस्त..2
ती कल्पवृक्ष
अन् झाडे माडाची
ती अहोभाग्य..3
समुद्री तट
मच्छिमार सुसज्ज
करण्या काज..4
उफाळी लाटा
फेसाळला समुद्र
किनारी आर्द्र..5
तो उगवला
नारायण पूर्वेला
प्रतिबिंब ती..६
क्षितिजावरी
सोनेरी सौंदर्याक
मन अवाक..7
