STORYMIRROR

Gangadhar joshi

Abstract Others

4  

Gangadhar joshi

Abstract Others

रुद्र मंथन

रुद्र मंथन

1 min
428

अलगद उतरला सोनकवडसा श्रावण धारा मेघातून

नाचू लागले मोर केतकी रंग मोहरले रेशमातून


शिरशिर शिरशिर शिरला वारा रूपेरी त्या पंखातून

उबदार ही शीळ घालीत राघु फिरला रानातून


घडघड घडघड झाड हलले हलला पक्षी देठातून

थरथरथर अंग मोहरले उसवले हिरव्या पानातून


झरझर झरझर रुद्रमंथन ते तलम सोनशलाकांतून

सा रे ग म सरगम उठती वृंदावनी त्या वेणूतून


बहरे रंग रंगीत बहार हा सृजनाच्या कर्णकोशातून

कोशातून तृप्त झाले निसटले मोती चोचीतून


हरहर हर्दिनी अमृतवाणी स्त्रवते पाणी झऱ्यातून

तड़तड़तड़ शब्द पाझरे सरस्वतीच्या वीणेतून


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract