STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Fantasy Others

3  

Meenakshi Kilawat

Fantasy Others

ऋतू

ऋतू

1 min
726


ऋतू येती ऋतू जाती अनंत

निसर्गालाच्या नित्य असे सोबतीला

जणू प्रेम जिव्हाळा भरूनी येती

अन बदलती ऋतू क्षणाक्षणाला...!!


ऋतू वसंत, शरद,हेमंत,शिशिर

अन ग्रीष्म ऋतू जगात वैभव भरी

ब्रम्हांडातील कर्तव्यपारायण ही ऋतू

निस्वार्थपणे सदा अपूले कार्य करी...!!


कालचक्राच्या प्रवाहात रंगती

होई रात दिवस सुखदुखाची कला

युगामागुनी युगे अवतरूनी येती

जणू मर्मबिंदू ओळखतो मनातला...!!


उन्हाळा हा वणव्यात रडवितो

पावसाळा हा पावसात भिजवितो

हिवाळा गारव्यात सुखवितो

पृथ्वीवर ऋतू आल्हाद पसरवितो...!!


यशअपयशाचा भार पचवितो

कधी सुखसमाधान मान आनितो

मनात हे भाकित करूनी सुखावी

झणी बदलतो ऋतू क्षणाक्षणाला...!!


वर्षभऱ्यात येती ऋतू हर्ष घेवूनी

कधी जणू उदास करी या मनाला

खेळत,रांगत नाचत अलगद

येती तान्ह्या बाळापरी उत्कर्षाला...!!


निसर्गाला क्षणाक्षणाला साथ देती

रम्य ऋतूचा सोहळा अनहद गाजे

कधी मौन पांघरती वादळ वारे

मनमोहक सृष्टीचा रंग मदमस्त सजे...!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy