STORYMIRROR

Shivani Hanegaonkar

Abstract Classics Inspirational

3  

Shivani Hanegaonkar

Abstract Classics Inspirational

ऋतुराज वसंत

ऋतुराज वसंत

1 min
237

मी पानगळ संपवणारा

मी नवचैतन्य देणारा

आसमंता ऐक माझेे

मी ऋतुराज सृष्टी तुझी फुलवणारा


मृगतृष्णा भरलेल्या नजरेला आल्हाद आम्रबहारांचा देणारा

जिभेवर रंगाळणारी लालसा

नी घोट पाण्यानी भरणारा

मी नवलाई मी पूर्वाई

मी ऋतुराज उधाण वार्याला देणारा


हिंदोळ्यावर झुलणार्या मनाला आठवण सईची देणारा

चहुदिशाचे लाल गुलाब स्मृतीत भिजवणारा

मी प्रेम गाणी मी प्रेम कहाणी

मी ऋतुराज संबंंध आसमंत व्यापणारा


चराचर रंगणार्या रंगाला देण रंगोत्सवाची देणारा

इहलोकी स्वर्ग सुखाचा वसंत उत्सव रंगवणारा

मी श्रीरंग मी वसंत

मी ऋतुराज अवघा रंग एक होणारा


मी पूर्वाध ग्रीष्माच्या झळा सोसणारा

मी उतरार्ध शिशिराचा गारठा संंपविणारा

ऋतुचक्रा ऐक माझे

मी ऋतुराज भूलोकी सृजन सोहळा निर्मिणारा



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract