ऋणानुबंधांचे रेशीमबंध
ऋणानुबंधांचे रेशीमबंध
ऋणानुबंधांच्या गाठी.....
जन्मजन्मांतरीच्या......
साक्ष पटते मनोमनी......
खुणा कळती अंतरीच्या.....
कधी सहजभेट.....
तर कधी अचानक ओळख....
कधी ठरवलेली......
नंतर मनाला भावलेली.....
कधी मैत्रभाव.....
तर कधी नाती जुळलेली....
अगदी सहोदराचे नाते.....
जन्मभरी अभंग रहाते......
ऋणानुबंध गाढ स्नेह , प्रेम देतात.....
कधी माया , वात्सल्य भरभरुन देतात.....
तर कधी स्पष्ट बोलून वाईटापासून बचावतात.....
कधी कळकळीने बोलून नुकसान वाचवतात......
कोणी तोडायचा प्रयत्न केला तरी....
हे रेशीमबंध अतूट असतात....
ह्या रेशीमगाठी घट्ट असतात....
जन्मजन्मांतरीचे नाते....
योगायोगाने ऋणानुबंधातून जुळते.....
प्रेम , मायेच्या वर्षावात अगदी चिंब चिंब भिजते.....
