ऋण श्वासस्पंदनांचे
ऋण श्वासस्पंदनांचे
प्रतिमा तुझी मी
मुलगी तुझी आहे
सगुणतेचा इंद्रधनू तू
रंंग त्याचे उधळते
संस्काराची तुझ्या शिदोरी
कायम जवळ असे
सौजन्याचा करंडाही
मनात जपलासे
सप्तपदीचा उपदेश मला
नवी दिशा देतो
अंधारातही आशेचा
एक कवडसा दिसतो
सुखदुःखात माझ्या
मोल तुझे मोठे
आयुष्याचे ओझे
हलकेसे वाटे
कष्टाचेेे जीवन माझे
टप्पेे संघर्षाचे
तुझ्या आदर्शतेने
झाले ते सोपे
सजीवतेेचा झरा असाच
अमर जलाने भरो
या जलाचे अमृत प्राशुनी
चेतना मला मिळो
परोपकारचा निस्वार्थी ठेवा
दान मला केल
सदैव राहील ऋणात तुझ्या
हा श्वास स्पंदनाचा
सदैव राहील ऋणात तुझ्या
हा श्वास बंधनाचा
