रंगली भजनात मिरा
रंगली भजनात मिरा
मिरेच्या मनी श्याम
नसे तिज देहभान
गाते ती कृष्ण गान
हरवते त्याच्या रंगात
मधुर मुरलि कान्ह्याची घालते तिज साद
गाते त्याचिया विरहात
हि कान्हा बावरी
मिरेची भक्ति श्रेष्ट की राधेची प्रित ती
प्राशले विष तिने ,सोडली लोक लाज ही
पहा कशी मिरा ती रंगली कान्हा भजनात