STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Inspirational

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Inspirational

रंगांची उधळण..

रंगांची उधळण..

1 min
237

ओळखा माणसांचे रंग

जा रंगात सारे रंगुन,

जनामनातून व्हावी

रंगांची खरी उधळण.


ज्याचे त्याचे रंग निराळे

रंग कोणता कुणास लाऊ,

फक्त प्यारा मला तिरंगा

शपथ तिरंग्याची घेऊ.


निळा, भगवा, हिरवा,पिवळा

काय मांडला हा खेळ,

विसरून भेदाभेद सारे

जाना एकीचे बळ.


रंग एकीचा घ्या गडयांनो

दया भेदभाव सोडून,

राष्ट्रभक्तीचा रंग चढू दया

खरी ती रंगांची उधळण.


रंग माणुसकीचे हवे

हवा धर्म माणुसकीचा,

होळी द्वेषाची करावी

नाश करू दुष्टपणाचा.


बंधुभाव वाढवा सारे

ऐक्य ठेवा जपून,

राष्ट्रहित जपू या

करु रंगांची उधळण.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational