STORYMIRROR

Padmakar Bhave

Fantasy Others

3  

Padmakar Bhave

Fantasy Others

रंग

रंग

1 min
129

ऐसें व्हावे की...

उघडोत कवाडे,बंद कधीचे जे हो,

किलकिले करावे दार मनाचे ते हो


हलकेच मनाने शीळ मना घालावी

हृदयाच्या पिंपळपानावरती न्हावी


ओळखता यावे हितगुज गूढ मनाचे

तळहाती धरता यावे अश्रू उन्हाचे


उतरुच नये तो रंग कधीही फुलांचा

रंगल्या गंधल्या हळव्या गोड क्षणांचा


जग घेता यावे मिठीत अलगद सारे

ओठांनी चुंबून घेता यावे तारे


स्वप्नांना आणिक हळवे कोंब फुटावे

मातीसह गगनावरती गात सुटावे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy