रंग
रंग
रोज एक नवीन रंग
आपला स्वभाव ही तसाच असावा
ज्याने इतरांना दुःखाचा विसर पडावा
शरीररुपी कोणताही रंग असावा
पण दिसावी चेहऱ्यावर नेहमी सकारत्मकता
सरड्यापरी रंग बदलुन
सहवासातील व्यक्तींना आपल्यामुळे त्रास न व्हावा
वाटत असेल आयुष्य अगदीच बेरंग
बनुनी बघावं,इतरांच्या हसण्याचं कारण
येत असेल जर नेहमी अपयश
मेहनतीचा रंग लावून करावी यशाची उधळण...
