रंग सोहळा
रंग सोहळा
एकवीस ऑक्टोबर 2023...!
रंग सोहळा...6
शनिवार आजचा रंग राखाडी......!
श तका नंतर उगवली
नि त्त्याची वेगळी सकाळ
वा ट पाहते हसत म्हणाली
र विराजाची पाहण्या सुकाळ....
आ ता विश्वात्मके म्हणुनी
ज रा सावरते म्हणते
चा ल जीवनाची पुन्हा एकदा
रं गुनी आत्म रंगात....
ग त काळाची घडी
रा बुनी बसवीते म्हणते
खा च खळगे भरुनी काढण्या
डी वचूनी मनास वेगळ्या ऐटीत...
दडले जीवन सारे आळसटलेले
नभा आडच्या राखाडी रंगात
ठेवणीतली काढुनी साडी नारी म्हणते
नेसते घालूनी समरंगी चोळी अंगात...
सरले मळभ सारे जीवनातले
खुलुनी येता सौन्दर्य सामोरी
नवचैतन्य अंगी संचारता भाळलो
पाहता राखाडी रंगाची किमया अंगावरी...!
