STORYMIRROR

Dattatraygir Gosavi

Abstract

3  

Dattatraygir Gosavi

Abstract

रंग पंचमी

रंग पंचमी

1 min
224

पळस फुलं, आणुन छान

भरलिया पिचकारी

रंगाची $ $ रंगाची

केलीया उधळण।।धृ।।


दिस हेवं छान, रंगाचा मान

रंगात रंगली होळी

रंगली $ $ रंगली 

लहान थोरांची गालं।।१।।


पुरण पोळी,सारं येसवारं

शिव्या शापांची,देवान घेवान

होळीची $ $ होळीची

खेळुया धुरवड।।२।।


दुधात भांग, भांगेत दंग

वेळू ती, भरलीया पिचकारी

गुलाबी $ $ गुलाबी

धार उडे दुरवरं ।।३।।


नणंद देरं ,देर भावजय

नातं असं हे,गोड थट्टेच

रंगती $ $ संगती

चिखलफेक धुमशान।।४।।


निसर्ग देतो,निसर्ग घेतो

आनंद हा विभागुनी

आनंदी $ $ आनंदी

खेळले अवघे जन।।५।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract