रंग लाल...
रंग लाल...
उत्कटता आणि प्रेम
लालरंगी सामावले
गर्द गहिरे गहिरे
छंद त्याने जोपासले.....१
अलवार चाहुल ती
प्रीत मनात जागते
हळूवार स्पंदनाची
साक्ष गाली उमटते.......२
नाव अधरी येताना
लाल रंगाची ती लाली
कोमेजल्या मुखावरी
छटा लाजेची ती ल्याली......३
लाल गुलाब प्रतिक
सांगे अबोल वाणीने
प्रेम माझे तुझ्यावर
झुकलेल्या पापणीने.........४
भाव उत्कट प्रेमाचा
लाल रंगाने वाहिला
अनमोल नजराणा
काळजात रूतविला..........५
