रंग केशरी
रंग केशरी
केशरी कोवळ्या उन्हाची
तिरीप पडता अंगणी
उत्साहाला उधाण येऊन
नाचू लागते धरणी
उत्सव सोहळा सुरू होता
उधळण होतेे सुमनांची
इश्वराशी भेट व्हावी
इथेच समाधानी मनांची
सोनसळी न्हावून निघाली
धरणीला नवी झळाळी आली
चिमणी पाखरे घरट्यातून
पोटासाठी दूर निघाली
