STORYMIRROR

Pranjali Kalbende

Abstract Others

3  

Pranjali Kalbende

Abstract Others

रंग काळा...

रंग काळा...

1 min
187

परिष्कार अस्तित्वाचे

रंग काळा स्विकारतो

घनघोर अंधाराचे

भय उरी दडवतो.......१!!


मान्य हि अभिजातता

काळ्या रंगाचे वैशिष्ट्य

दोषारोषणास साहे

तरी हसरेच औष्ठ्य......२!!


दोषासह गुणांनाही

जोपासतो काळा रंग

काळी माती गाई गाणी

पिकवतो धान्य अंग..... .३!!


डोळ्यातल्या काजळाला

गारव्याची शीत हवा

सौदर्याला खुलविण्या

केस संभार बरवा......४!!

 

भव्य सहनशीलता

शक्ती काळ्या या रंगात

सर्व रंगा सामावून

घेण्या ध्यानस्थ नादात.......५!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract