रंग गुलाबी केशरी...
रंग गुलाबी केशरी...
दिवस अन् रात्रीच्या काठावर ,
सांज सागरात उतरत होती ,
तुझी सोबत हवी तिला ,
ती रोज मला खुणावत होती...
मऊशार रेताळ वाटेला,
नदी रोज ओलावत होती,
सागराची साथ तिला ,
उधाणलेली लाट होती...
रंग गुलाबी केशरी जांभळा,
लाजुन सांज गेली होती,
क्षितीजाच्या प्रेमात ,
सांज हरवुन गेली होती...
सहावेना हा दुरावा ,
सोबतीच्या क्षणांची विनंती होती,
ही रात्र रेशमी बंधानी ,
सप्तपदीने अलवार गुंफली होती...

