रम्य ते बालपण
रम्य ते बालपण
बालपणीचा , काळ मजेचा
खेळ गप्पा नि , हुंदडण्याचा
नुसते खेळा , मजेत लोळा
नाही चिंता , ना बंधने पाळा
लाड करती , आजी आजोबा
सदा म्हणती , मज लाडोबा
आई बाबांना , मी हवाहवा
देती खाऊ , मज सुकामेवा
सवंगड्यांसवे , मी रमतो
रोज मैदानी , खेळ खेळतो
बालपणीचा , काळ मजेचा
मजा राहूनी , उपभोगायचा
