STORYMIRROR

purushottam hingankar

Children

3  

purushottam hingankar

Children

रम्य असे बालपण

रम्य असे बालपण

1 min
184

बालपण माझे देवा 

सारे खट्याळची होते 

गुण्या गोविंदे खेळता

तेव्हा आनंदित होते!!१!!


आले मोबाईल दिन

सारे सोडूनिया दिले

गेम सेल्फीच्या नादाने

मज पांगुळ ते केले!!२!!


विटी दांडू चेंडू फळी

आज सर्वं हिरावले

आट्या पाट्या आणि गोट्या

आज सर्वं हरवले!!३!!


लांब गद्दी नी कबड्डी

मज सोडूनिया गेले

आनंदाचे बालपण

मज सोडूनिया गेले!!४!!


सुस्त झालो मीचं आज

माझे डोकेही चालेना

 आज तरुणपणीच 

वृद्धपण ते आलेना?!!५!!


संतदास म्हणे गड्या 

गेला मर्दानीचा खेळ

हाता मोबाईल घेता

 लागे जीवनाशी येळ!!६!!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Children