STORYMIRROR

purushottam hingankar

Others

3  

purushottam hingankar

Others

संत संगती

संत संगती

1 min
189

संत संग करा जिवाच्या उद्धारा,

नर्कवास खरा कुसंगेची!!१!!


देई रे संगती साधूची ती देवा,

दुर्जने केधवा अधोगती!!२!!


उद्धरे वाल्मिक नारदा संगती 

 कौरवा संगती कर्ण गेला!!३!!


संतदास म्हणे सतसंग धरा,

जीवाते उद्धारा आपुलिया!!४!!

_______________________________


अर्थ :- जिवाच्या कल्याणसाठी संत संग करावा कुसंगाने अधोगती नरकवासच होईल.....१


देवा साधूची संगती दे कारण दुर्जनाच्या संगतीत अधोगती आहे रें.....२


संत नारदाच्या संगतीने वाल्मिकाचा उद्धार झाला आणि कौरवाच्या संगतीने दानशूर कर्नाला सुद्धा प्राण सोडावा लागला....३


म्हणून संतदास म्हणतात संत संगती करा जेणे करून आपल्या जीवाचा उद्धार होईल अशी संगती करा ....४


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍