नामामृत
नामामृत
1 min
155
नाम तुझे गोड अमृताचा ठेवा,
मुखी मज द्यावा पांडुरंगा!!१!!
करीन अट्टाहासे सेवा निरंतर,
हाची मज वर देई देवा!!२!!
दिल्यावीन काही घेत नाही देवा,
निष्काम हे सेवा नाम रूपं!!३!!
संतदास म्हणे मी तुझे बालक
पूरवी तूं एक आस माझी!!४!!
