समाधी धनं
समाधी धनं
1 min
177
ज्ञानेश्वर माझी विश्वाची माऊली,
ध्यानाला बसली अखंड ते!!१!!
तन मनं ध्यान पांडुरंगी रूपं,
समाधी स्वरूप आत्मतत्वी!!२!!
जगाच्या कल्याणा अखंड चिंतन,
साधीयेले धनं समाधीत!!४!!
रामकृष्ण हरि गोविंद गोपाळ
मार्ग हा प्रांजळ ज्ञानोबाचा!!५!!
संतदास म्हणे जीवाचे कल्याण
सेविता चरण ज्ञानोबांचे !!६!!
नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधीस्त!!
