STORYMIRROR

purushottam hingankar

Others

3  

purushottam hingankar

Others

अभंग

अभंग

1 min
179

 धर्मं नव्हे बापा माणसा घातकी,

असेल त्या पोखी मानवाशी!!१!!


धर्म तो जोडे मानवाशी सदा,

तोडी हेची बाधा त्याशी नव्हे!!२!!


धर्म नव्हे कदा भाषा बोलण्याचा,

आचार कर्माचा धर्मं असे!!३!!


बोलणी उच्चार त्यागमय करा,

तोची होय खरा धर्मं बापा!!४!!


संस्कार घडणी ते अंगवळणी,

पडावे ते धनी सर्वासाठी!!५!!


संतदास म्हणे तोची धर्मं खरा,

येर तो पाल्हेरा नका करू!!६!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन