क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले
क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले
1 min
156
दीन दुबळ्यांचे अश्रू
पुसण्या पृथ्वीवर आला
महाराष्ट्राच्या मातीत
क्रांती सूर्य हा जन्मला१!!
धर्माचा ऱ्हास होता
धर्मं भास्कर उगवला
दीन दुबळ्याच्या पोटीचा
सर्वं अंधार नष्ट केला!!२!!
अभंगाचे आसूड मारुनी
केली ज्ञानाने जागृती
सावित्रीच्या साथीला
धावूनी गेला असे ज्योती!!३!!
स्पृश्य अस्पृश्यता जगाची
सर्वं करुनिया नष्ट
केले साक्षर सर्वांना
देशो धडी लाविले भ्रष्ट!!४!!
असा हा अवलिया ज्योती
जगाचा महात्मा झाला
हसवूनी तों सर्वांना
निरोप जगाचा घेतला!!५!!
महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
