रक्तदान पुण्यदान
रक्तदान पुण्यदान
एका रक्ताच्या थेंबाने
देई आयुष्य जीवास,
रक्तदान करण्याने
वाढे जगण्याची आस.
फेडे ऋण समाजाचे
दान करून रक्ताचे,
वाचे प्राण मनुष्याचे
लाभे अशिष दाताचे.
वाचवता एक जीव
मिळे त्यास वरदान,
करे खरी देश सेवा
दान हेच रक्तदान.
रक्त सांडता उगीच
हिंसा करे समाजात,
तेच करे रक्तदान
वाढे अहिंसा जगात.
थेंबथेंब साठवावा
रक्तपेढी वाढवावी,
गरजेस उपयोगी
क्षणी पडता मिळावी.
