रजनी
रजनी
काळोखाच्या रजनीमधूनी
चोर पावले झरझर जाती
भिती , शंका काहूर मनी
घाई लगबगीने पळती
बाळ सानुले झोपे खुशीत
शांतपणे आईच्या कुशीत
स्वप्नी नयनी नित्य खेळती
चंद्र चांदण्या तया हसवीत
मुग्ध नवोढा लाज लाजूनी
रमते प्रियाच्या शृंगारात
प्रिय शर्वरी नच संपावी
दोघांच्या गाढ प्रेमालापात
ताई दादा जाग जागती
तरी न उरके अभ्यास
रात्र सरता डोळा लागे
कोंबडा लागे आरवण्यास
वेगळ्याच रात्रीच्या विविधा
प्रत्येकाची रजनी वेगळी
कुणा वाटे रजनी छोटीशी
लांब दीर्घशी कुणा आगळी
