रीती ओंजळ
रीती ओंजळ
किती लढणार स्वतःशीच असा,
किती लढणार तू या जगाशी?
दोन वेळची भाकर सोडून,
इतका कसा झालास रे हव्यासी..?
काय आहे तुझे असे ,स्वतःचे इथे?
रिती ओंजळ घेऊनच ना आला?
एक कफन असेल नशीबी सरणावर,
मग उगा हक्क गाजवितो कशाला?
पूरे कर तो हापाप संपत्ती -पैशाचा,
काय आहेस सोबत घेऊन जाणार ?
नात्या गोत्यांचा विसर पडला तुला,
मागे तुझ्या कोण कसा रे रडणार ?
सूर्यास्त ही सांगून जातो साऱ्यांना,
जो उदयाला येतो तो अस्त होणार..
मग का करशी आटापिटा जीवाचा ?
सारं इथेच तर सोडून जावं लागणार..
कोणाचं भविष्य घडवाया निघाला?
जन्मशी एकदा तोही झुरत जगणार?
अरे ज्यांच्यासाठी झिजवशील आयुष्य,
ते तरी लेका असे किती दिवस रडणार .
