रात्र शहारणारी
रात्र शहारणारी
काळाकुट्ट अंधार दाटला
रातकिडे किरकिर करू लागले
भयाण शांततेत मज अंग
थरथर कापू लागले ।।1।।
दबक्या पावलाने मी
झपझप पावले टाकू लागलो
कळे ना मज भय
कसे वाटू लागले ।।3।।
रिपरिप पावसाची सुरु होती
रात्र ती मंतरलेली होती
भयाने घामाच्या धारा वाहती
पाहतोय तर ती एक भयरात्र होती ।।3।।

