रात्र मी चंद्र तु
रात्र मी चंद्र तु
रात्र मी चंद्र तु ,
उजाळलेला रंग तु ,
अंग मी संग तु,
अधिर मनाचा छंद तु ...
गुलमोहराचा फुलोरा,
चाफाही दरवळला सारा,
प्राजक्ताचा सांडला सडा,
तुझा सुगंध वाहतो वारा...
वटाभोवती घातला फेरा,
हाच मिळू दे नवरा ,
हृदयाची स्पंदने गाती ,
रोमरोमी चढला पारा...
नाचरा वळीव तु,
मी मृदगंध मोहनारा ,
बिलगूनी मातीस असा,
फुलवी मोर पिसारा...
एक लग्न असेही ,
मी धरती तु ध्रुवतारा ,
उगम माझा तुझ्यातुन,
वाहते निर्झर अमृतधारा ...
रात्र मी चंद्र तु ,
उजाळलेला रंग तु ,
अंग मी संग तु,
अधिर मनाचा छंद तु ...