STORYMIRROR

Dilip Yashwant Jane

Inspirational

4.7  

Dilip Yashwant Jane

Inspirational

रानफुले

रानफुले

1 min
3.2K


ऋतू वर्षाने दिधले

दान साऱ्याच बिजांना

टरारून भूगर्भात

फुटे अंकूर साऱ्यांना


रानफुल माळरानी

असे उमलले छान

सारे हे रंगीबेरंगी

कसे फुलले कानन


फुला फुलात बागडे

वेडी ती फुलपाखरे

पंख रानफुलापरी

क्षण सारेच गोजिरे


माळरानी त्या उजाड

रानफुले लहरती

आनंदाने सारी कशी

वाऱ्यासवे रे डोलती


शिळ घालत येता तो

करी हर्षाने स्वागत

गुजगोष्टी सोबत्यांशी

करी फुले ती हसत


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational