STORYMIRROR

jaya munde

Inspirational

3  

jaya munde

Inspirational

राम जन्मले

राम जन्मले

1 min
253

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

   राम जन्मले अयोध्यामधी

   पर्व सृष्टीचे नविन रेखण्या,

   राज्य केले खरे मनांमनामधी

   सत्य आचार जगा शिकवण्या.


  अयोध्या पावणभूमी अशी ती

  दशरथ-कौशल्या पुण्यवान,

   ऐसा राजा रयतेस लाभला

   सुखी प्रारब्धे सारे भाग्यवान.


   अयोध्याभूमी पवित्र झाली

   रामजन्म अवतार देवाचा,

   परि त्याच्याच नशिबी का

   वनवास चौदा सालाचा....


  अन्यायाचे उच्चाटन करूनी

  सत्ययुगाची निर्मिती केली,

   लाख वादळे सोसली तरी

   एकवचनी कधी न ढळली...


   युगानुयुगे पूजीत राहील

   त्याच्या गुणांच्या कथा,

   सृष्टीसही अभिमान बहू

   युगपुरूषाने सोडवल्या व्यथा.


  आचरण त्या गुणांचे करूनी

  रामायण सांगते परंपरा,

  नमन शतशः चरणी देवा

  नित्य गुणांना आचरा....

🚩🚩🚩🙏🙏🚩🚩🚩


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational