STORYMIRROR

Tushar Chandrakant Mhatre

Tragedy Others

3  

Tushar Chandrakant Mhatre

Tragedy Others

राक्षसी ढग

राक्षसी ढग

1 min
172

पुन्हा एकदा आकाशाला

काळ्या ढगांनी वेढले

अन् मातीतल्या लेकराचे

आशांचे पीक वाढले


पुन्हा एकदा दिनकराला

गर्द छायेने झाकले

अपेक्षांच्या हिरव्या प्रकाशाने

जमिनीचे भाग्य उजळले


पुन्हा एकदा त्या मेघांनी

आसमंत स्पर्शले

प्रसवाच्या भावनांनी

धरेचे अंतरंग हर्षले


पण...

हे राक्षसी ढग कसले,

जे जमिनीतून निघाले?

विनाशक नळकांड्यातून

आकाशात उडाले...

धुरांड्याच्या जहराने

आशेचा मृत्यू झाला

प्रगतीच्या काळ्या मार्गाने

बळीराजाच बळी गेला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy