राज्यकर्ती अहिल्या
राज्यकर्ती अहिल्या
स्त्री कर्तृत्व गौरवीता
अहिल्याची छबी दिसे,
गुणगान करताना
कार्यक्षम मूर्ती ठसे..!!१!!
होळकर घराण्याचे
गाजे अलौकिक नाव,
सासऱ्यांच्या इच्छेसाठी
कळे अहिल्याची धाव..!!२!!
मोठी विश्वास पात्रक
बुद्धी कुशाग्र चंचल,
राज्यकर्ती कारभारी
घेई निर्णय अटल..!!३!!
सुधारक दूरदृष्टी
प्रजाहित हेच पाही,
सौम्य स्वभावाने जरी
कणखर नित राही..!!४!!
कार्य सामाजिक ठेवी
साहित्यास पुरस्कारी,
जीर्णोद्धार मंदिराचा
करे सर्वांना उद्धारी..!!५!!
